आर्यन खान प्रकरण: मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी

31

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका निनावी फोन कॉलने त्यांना धमकी देण्यात आल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी दावा केला आहे की, त्यांना धमकीचा फोन कॉल राजस्थानमधून आला होता. समीर वानखेडे हे चांगले काम करत आहेत त्यांच्या कामात अडथळा आणू नका आणि टार्गेट करु नका असंही धमकावणाऱ्याने म्हटल्यांचं बोललं जात आहे.

या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. बॉलिवूडमधून समोर आलेलं ड्रग्ज कनेक्शन तसेच मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर नवाब मलिक एनसीबीवर सातत्याने आरोप करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप करत आहेत.

तसेच एनसीबीचे झोनल चीफ समीर वानखेडे आणि त्याच्या परिवारावर सुद्धा नवाब मलिक आरोप करत आहेत. समीर वानखडेंचे दुबईतील फोटो नवाब मलिकांनी केले ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिका आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडेंचे दुबईतील हॉटेलमधील फोटो काल (21 ऑक्टोबर 2021) ट्विट केले.  आपण दुबईला गेलोच नव्हतो, असा दावा समीर वानखडेंनी केला होता. हा दावा खोटा असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी समीर वानखडे दुबईतील हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विट केले आहेत. नवाब मलिक विरुद्ध समीर वानखडे या वादाची मालिका अजूनही सुरूच असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.