मोठी बातमी! हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडणार? ‘हे’ आहे कारण
कोल्हापूर: अहमदनगरचे पालकमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री पद सोडणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मुश्रीफ केवळ दोन वर्षांसाठीच पालकमंत्री पद घेणार असल्याचं त्यांनी पक्षाला सांगितलं होतं. त्यामुळे पालकमंत्री पद सोडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद सोडत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
पालकमंत्रीपद सोडण्याबाबत हसन मुश्रीफ यांनी कारण दिलं असलं तरी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांना पद सोडावं लागत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हसन मुश्रीफ सातत्याने चर्चेत होते. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. या संदर्भात 2700 पानाचे पुरावे त्यांनी दिले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे पुरावे सोमय्या यांनी आयकर विभागाला सोपवले आहेत.
हसन मुश्रीफ यांनी सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे म्हटले आहे. किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत.
Read Also :
-
आर्यन खान प्रकरण: मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी
-
पुण्यात दिवसाढवळ्या भररस्त्यात गोळीबाराचा थरार, दोघांचा मृत्यू
-
“देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरज लागत नाही” ; भाजप मंत्र्याचे बेताल वक्तव्य
-
100 कोटी लसीचा विक्रम, या यशामागे 130 कोटी देशवासीयांचे कर्तव्य – पंतप्रधान…
-
‘आम्हाला देवळाची घंटा वाजविण्याची सवय, आज पहिल्यांदा नाट्यगृहातील घंटा वाजवली’ –…