“मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?”; राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोमणा

3

बुलढाणा: “साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचेच काम महाराष्ट्रातील विद्यमान सरकार करत आहे. मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?” असा सवाल केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केला.

बुलडाणा जिल्ह्यातील ‘चिखली अर्बन बँके’च्या हीरक महोत्सवानिमित्त बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांनी उद्योजकता प्रोत्साहन आणि प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. राणे त्या कार्यक्रमात बोलत होते. सध्याचे मुख्यमंत्री अज्ञानी आहेत, असे राणे नाव न घेता म्हणालेत.

“साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचेच काम महाराष्ट्रातील विद्यमान सरकार करत आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, हे कळतच नाही. केवळ त्यांना वाटतं मी पदावर आहे. मात्र अतिवृष्टी आली, वादळ आलं, दुष्काळ पडला तर केंद्रानेच द्यावं, अशी राज्य सरकारची अपेक्षा असते. मग तुम्ही तिथे कशाला बसलात?” असा टोला नारायण राणे यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? असा सवालही राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केला.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.