मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने आपला पक्ष संपवला – चंद्रकांत पाटील

3

सागली: शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केला आहे. तसेच, भाजप हाच राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याची दावाही त्यांनी केला आहे. ते सांगलीत बोलत होते. राज्यात भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे.

शिवसेनेने मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपविला आहे. हे अजूनही त्यांच्या लक्षात येईना, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते सांगलीच्या पेठ नाका येथे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सदस्यांचा सत्कार प्रसंगी बोलत होते.

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमदध्ये भाजपने 21 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप राज्यात 1 नंबरचा पक्ष झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 17 जागा मिळाल्या तर शिवसेनेला केवळ 12 जागाच मिळाल्या. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने आपला पक्षच संपवला आहे. गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे. तरीही ही गोष्ट शिवसेनेच्या लक्षात येत नाहीये. असो. हा त्यांचा प्रश्न आहे. यापुढे भाजप सर्व निवडणूका पक्ष चिन्हावरच लढवेल. अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.