रामदास कदमांची अवस्था ना घरका ना घाटका अशी – निलेश राणे

सिंधुदुर्ग: आज सकाळीच रामदास कदम यांची खळबळजनक आरोप करणारी पत्रकार परिषद पार पडली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल परबांवर जोरदार हल्लाबोल चढवत, अनेक गंभीर आरोप केले. अनिल परब शिवसेना पोखरत असल्याचाही आरोप कदामांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्यानंतर कदमांच्या या घरच्या अहेरावर विरोधी पक्षातूनही जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनीही यावरून टीका केली आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करताना, राम कदम यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे, असे ते म्हणाले. रामदास कदम यांनी राणेंवर टीका करण्याचं काम केलं कारण त्यांना मातोश्रीतून बक्षीस हवे होतं. त्यांनी ते विरोधी पक्षनेते पद मिळवलं आणि ते पद फक्त राणेंना शिव्या घालण्यासाठीच होतं आणि आज त्यांची शिवसेनेमधे ना घर का ना घाटका अशी अवस्था झाली. असा शब्दात निलेश राणे यांनी रामदास कदम यांचा समाचार घेतलाय.

राम कदम आणि त्यांचा मुलगा आता कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांची किंमत शून्य आणि ती त्यांनीच करून घेतली. राजकारणात खोट बोलून जास्त काळ टीकता येत नाही, हे रामदास कदम यांना आता कळून चुकल असेल, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे. शिवसेनेतून सर्वात आधी रामदास कदम यांचीच हकाल पट्टी करायला हवी होती. कारण रत्नागिरीत राष्ट्रवादीला मदत करणारा नेता म्हणजेच रामदास कदम आहे. असा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वादही आता चव्हाट्यावर आला आहे.