टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरण: तुकाराम सुपेंच्या घरातून तब्बल 2 कोटी रुपयांसह सोने जप्त
पुणे: आरोग्य आणि म्हाडानंतर आता टीईटी परीक्षेचे पेपर फुटल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी तुकाराम सुपे यांच्याकडून ९० लाख रुपये आणि सोनं जप्त केलं होतं. त्याच प्रकरणात आता पोलिसांना आणखी माहीती हाती लागली असून, आता तब्बल २ कोटींचं रुपयांचं घबाड व सोने त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलं आहे.
महाटीईटी परीक्षेची जाहिरात 2019 मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर याची परीक्षा जानेवारी 2020 मध्ये झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे. पुणे पोलिसांना तुकारामा सुपेच्या घरात 2 कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी सोनं देखील जप्त केलं आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अद्याप तपास सुरु आहे, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
आरोग्य विभागाच्या पेपरफुटीचा तपास करताना सायबर पोलिसांना म्हाडा पेपरबद्दल माहिती प्राप्त झाली होती. म्हाडा परीक्षेचा पेपर फुटताना जी. ए. सोफ्टवेअर कंपनीचा डॉ. प्रीतीश देशमुख याच्यासह अन्य दोन जणांना सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली. देशमुख याची झडती घेतली असता त्याच्याकडे टीईटी परीक्षार्थींचे हाल तिकीट मिळाले होते. त्यामुळे टीईटीचा पेपरदेखील संशय वाढला होता.