विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम आज जाहीर होणार?

20

मुंबई: विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमात बदल केल्यानंतर या पदासाठी आज, शुक्रवारी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २८ डिसेंबरला निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. आज अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली तर त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार, २७ डिसेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक होईल.

आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरुन चर्चा होऊ शकते. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या, वीज बिल प्रकरण, शेती पंप वीज खंडीत करणे, मंत्र्यांना येणाऱ्या धमक्या रोखण्यासाठी एसआयटी तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली.

विधानसभा अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटेंचे नाव निश्‍चित

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने होणार असून काँग्रेसकडून या पदासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभा नियमात बदल करून ही निवडणूक आवाजी मतदानाने करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातच, महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन रद्द करून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याची खेळी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर खल झाला आहे. यास भाजपकडून हिरवा कंदील मिळाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.