राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

27

मुंबई: राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील खबरदारी घेण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचं म्हटलं आहे.

सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात वर्षा गायकवाड या दररोज सहभागी होत आहेत. सोमवारी देखील त्या उपस्थित होत्या. त्यानंतर आता मंगळवारी गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. ‘सोमवारी संध्याकाळी काही प्राथमिक लक्षणं जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी लक्षणं तुलनेने सौम्य आहेत. मी आता ठीक आहे आणि मी स्वतःला आयसोलेट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले त्यांनी खबरदारी घ्यावी अशी मी विनंती करते’, असं म्हटलं आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीत तब्बल 35 लोकांना कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, ३ पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.