हा कसला शिवसेनेचा आमदार?; मुलीवरील हल्ल्यामुळं एकनाथ खडसे आक्रमक!

5

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञातांकडून हल्ला झाला होता. रोहिणी खडसेंवरील हल्ल्या वरुन एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील  यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसेंवर हल्ला झाला असला तरी मी त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. दोन दिवसांपुर्वी मी ऑडिओ क्लिप जारी केल्या. ते आणि हल्ला करणारे हे एकच असून गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. महिलांवरील अन्याय कदापि सहन करणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

महिलांवर हल्ला करणारे कोण, विनयभंग करणारे कोण या गुंड प्रवृत्तीच्या लोक चौकशी झाली पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले. हा कसला शिवसेनेचा आमदार असा सवाल एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविषयी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जागेचा त्याग केला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील आमदार झाला आणि आता स्वत: ला शिवसैनिक म्हणून घेतो, असं एकनाथ खडसे म्हणाले.

चंद्रकांत पाटील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळं आमदार झाले. आता त्याच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.