अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये होणार

15

मुबंई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीला नागपूर येथे होणार आहे. याबाबतची मागणी आधीपासून करण्यात येत होती. हे हिवाळी अधिवेशन देखील नागपूरला व्हावं, अशी चर्चा असताना कोरोनाचं सावट आणि मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे अधिवेशन मुंबईतच घेण्यात आलं.

सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  देखील ऑनलाइनच्या माध्यमातून उपस्थित होते. नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन राज्य सरकारच्या निर्णयावरुन मुंबईत सुरु आहे. दरम्यान आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन मात्र नागपुरात होणार असल्याचं मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यानूसार अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीला नागपूर येथे होणार आहे. दरम्यान, याबाबतची मागणी आधीपासून करण्यात येत होती.

परंपरेनुसार प्रत्येक हिवाळी अधिवशन हे नागपुरात होतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुख्यमंत्री यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना काही दिवस विमान किंवा हेलिकॉप्टर प्रवास करता येणार नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन हे मुंबईत घेण्यात आलं.

मुख्यमंत्री या अधिवेशनात सहभागी होणार होते. पण शनिवारी घेण्यात आलेल्या कोविड चाचण्यांमधून धक्कादायक माहिती समोर आली. विधानभवन परिसरात कार्यरत असलेले कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार मिळून अशा 25 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री या अधिवेशनात सहभागी होऊ होता आले नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.