राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार; परळी कोर्टाने बजावला अटक वॉरंट

34

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. जामीन करून देखील वेळोवेळी बजावलेल्या तारखांना राज ठाकरे हे सतत गैरहजर राहिले आहेत. हे कारण सांगत परळी कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेस वर दगडफेक केली होती. या दगडफेकीच्या घटने प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. छठपूजेबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या रांची दिवाणी न्यायालयाने वॉरंट जारी केले होते.  आज परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट जारी जारी केले आहे. हे प्रकरण म्हणजे रेल्वेत परप्रांतीयांचीच भरती केली जात असल्याबद्दल वक्तव्य केल्या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 मध्ये अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले होते. अंबाजोगाईत मनसैनिकांनी एसटी बसेसवर दगडफेक करून महामंडळाचे नुकसान केले होते.

या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरेंना जामीन मिळाल्यांनतर ते अंबाजोगाई न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे अंबाजोगाई न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. राज ठाकरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. माने यांच्या न्यायालयासमोर हजर झाले असता तीनशे रुपये दंड घेऊन त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.