सत्तासंघर्षावर मंगळवारपासून नियमितपणे सुनावणी… गुणवत्तेच्या आधारावर होणार सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आज सुनावणी पार पडली. हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे देण्याची ठाकरे गटाची मागणी आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.  आजच्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले कि येत्या  २१ आणि  २२ फेब्रुवारीपासून पुढील सुनावणी होणार आहे. हे प्रकरण पाच नायमूर्तींकडेच राहणार असून याची नियमित सुनावणी होणार आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता. आजच्या सुनावणीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सत्तासंघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे राहणार आहे. आज सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक निकालाचे वाचन केले. नबाम राबिया प्रकरण सात नायमूर्तींकडे जाण्यासाठी पात्र नसल्याचे म्हटले गेले. हा खटला गुणवत्तेसह विचारात घेतला जाणार आहे. त्यामुळे आता गुणवत्तेच्या आधारे मंगळवारपासून सुनावणी पार पडणार आहे.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटले होते कि, शिंदे गटाने २१ जून रोजी विधानसभेच्या उपाध्यक्षांविरोधात दिलेली अविश्वास   नोटीस हा खोडसाळपणा आहे. नोटीस देण्यासाठी ठोस कारणही देण्यात आल नाही. उपाध्यक्ष आमदारांना ठरवतील असे केवळ गृहीत धरून हि नोटीस बजावली होती. त्यानंतर सिडने गटाने नबाम रेबियाचा संदर्भ देत त्यावर स्थगिती आणली.
आता पुढील सुनावणी सलग केली जाणार असल्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकरच लागणार असल्याचे चित्र आतातरी स्पष्ट दिसत आहे. शिवसेना नाक्की कोणाची यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!