४८ जागा लढवायला आम्ही मूर्ख आहोत का?,संजय शिरसाट यांचा बावनकुळेंना संतप्त सवाल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ४८ जागा देणार असल्याचे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा तो व्हिडीओ भाजपकडून तातडीने हटवण्यात आला आहे. बावनकुळे यांच्या या विधानावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ,ते म्हणाले कि बावनकुळे यांनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत.