भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले १२ आमदारांच्या फाईलवर सही न करण्यामागचे कारण

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीकडून खोचक टोले लगावण्यात आले. महाविकस आघाडीकडून सतत कोश्यारी यांच्यावर आरोप करण्यात येत होते. शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा थेट राजीनामा मागण्यात आला. महाविकास आघाडीच्या १२ आमदारांच्या फाइलवरील सहीवरुन देखील कोश्यारी यांना टार्गेट करण्यात येत होते. कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर यामागील कारण स्पष्ट केले.

कोश्यारी  यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले कि, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त १२ जागांसाठी नांव पाठवली होती. कोश्यारी यांनी शेवटपर्यंत त्याला मंजुरी दिली नाही.  त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले कि, महाविकास आघाडीची शिष्ट मंडळ येत राहील . इ त्यांना सांगितलं कि तुम्ही आधी हे पत्र बघा. पाच पानांचं पत्र आहे. पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. आणि शेवटी लिहिता कि, १५ दिवसात मंजूर करा. कुठे लिहिलंय कि, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतो कि, मला इतक्या दिवसांच्या आत मंजूर करून पाठवा.
कोश्यारी यांनी म्हटले कि, संविधानात कुठे लिहिलं आहे? ते जेव्हा समोर येईल तेव्हा तुम्हाला कळेल कि सत्य काय आहे. तसं पत्र पाठवलं नसतं तर मी पुढच्याच दिवशी त्यावर सही करणार होतो. तुम्ही असलॆ पत्र लिहिता , असे म्हणत कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना याबाबत जबाबदार धरले.