एखादा व्यक्ती जर तक्रार करत असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे, तक्रार केली म्हणून दहशतवाद होता कामा नये – संजय राऊत

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले. या आरोपावर श्रीकांत शिंदे यांनी म्हटले कि, संजय राऊत यांना उपचाराची गरज आहे.  संजय राऊत याची श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले कि, श्रीकांत शिंदे हे हाडाचे डॉक्टर आहेत आणि त्यांनी बरेच वर्ष प्रॅक्टिस केलेली नाही, एवढं मला माहिती आहे. जी माहिती मला मिळाली होती. ती मी पोलिसांना दिली. श्रीकांत शिंदे यांनी एवढं अस्वस्थ होण्याचं करणं नाही. शिंदे गटाकडून माझ्याविरोधात जे मोर्चे निघत आहेत. हे कायद्याचं राज्य असल्याचं लक्षण नाही. एखादा व्यक्ती जर तक्रार करत असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. तक्रार केली म्हणून दहशतवाद होता कामा नये. कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

राऊत यांनी पुढे म्हटले कि, महाराष्ट्रातलं संपूर्ण मंत्रिमंडळ पुण्यात प्रचारासाठी उतरलं आहे. केंद्रीय गृहमंत्रीही पुण्यात पाय लावून गेले. महाविकास आघाडीने हि निवडणूक भाजपासाठी किती अवघड करून ठेवली आहे हे स्पष्ट होते, असा टोला राऊत यांनी लगावला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!