हरिश साळवे यांचा आज सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून युक्तीवाद, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर जोरदार टीका

19
राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी पार पडली.  आज दोंन तास सुनावणी  सुरु होती. पुशिलं सुनावणी १४ मार्चला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला.  उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत,  यावरून साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला.

हरीश साळवे यांनी आज ऑनलाईन हजेरी लावली. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, त्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे या चाचणीला सामोरे गेले असते तर काय माहित त्यांच्या आघाडीतील एखाद्या पक्षाने त्यांची साथ सोडली असती, किंवा काहीही होऊ शकले असते, असे साळवे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला तिथेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा विषय संपला. ते बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. जे आमदार १६ अपात्र झाले तोच मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर आहे, असे साळवे म्हणाले. राज्यपालांनी ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी बोलावले होते. उद्धव ठाकरेंनी नकार दिला. त्यावेळी राज्यपालांसमोर पर्याय नव्हता त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे बहुमत चाचणीसाठी बोलावले.
साळवेंनी आज आक्रमकपणे युक्तिवाद केला त्यामुळे आज हि सुनावणी पूर्ण होणार होती ती झाली नाही. आता होळीच्या सुटीनंतर यावर सुनावणी होईल. त्यामुळे १४ मार्चला यावर सुनावणी होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.