देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे, जयंत पाटील यांचा विधानसभेत आरोप

24

हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप माजी मंत्री  जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. अशा जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहिती त्यांनी सभागृहात सादर केली. या सगळ्यामागे अधिकारी कोण आहेत, राजकीय नेते कोण आहेत, याचा लाभ कोणाला झाला, याचा खुलासा व्हावा अशी मागणी त्यांनी केली. एका महिन्याच्या आत विशेष अधिकारी नेमून दूध का दूध पानी का पानी करावे आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

गायरान जमिनींची स्थितीही फारशी वेगळी नाही. एकीकडे गावातील लोक गायरान जमिनी विकत आहेत तर दुसरीकडे ज्यांना राहायला जागा नाही असे गोरगरीब नाईलाजाने या जमिनींवर अतिक्रमण करून तिथे राहात आहेत. त्यांच्या राहण्याच्या प्रश्नाचीही दखल घ्यावी.

नोकरभरती नसल्याने अनेक युवक पीडब्ल्यूडी मध्ये परीक्षा देऊन घरी बसले आहेत. २०२० च्या एमपीएससी बॅचच्या मुलांना अद्याप कामात रुजू केलेले नाही. त्यामुळे फक्त निवडणुकीपूर्वीची घोषणा न राहता लवकर नोकरभरती करावी, अशी विनंती जयंत पाटील म्हणाले.
कांदा उत्पादक, कापूस शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सरकार आणत आहे. पण विम्याचे हप्ते भरण्यास शेतकऱ्याने कधीच नकार दिलेला नव्हता. त्यांचा आक्षेप जाचक अटींबाबत आहे. या जाचक अटी दुरुस्त करण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी विम्याच्या विरोधात आहेत. आता एक रुपया भरून विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपन्या दारातच उभे करणार नाहीत. त्यामुळे सरकारची भूमिका शेतकऱ्याला फसवणारी आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.