मोठी बातमी : राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत. मोदी आडनावावरून मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आता पुढे राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांना दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आता लोकसभा सचिवालयाने सदस्यत्व रद्द करण्याची मोठी कारवाई केली आहे.