राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा… मोदी आडनावावरून विनोद करणं भोवलं

राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून केलेले वक्तव्य महागात पडले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे ? असा प्रश्न विचारात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने राहुल गांधीना दोषी ठरवले आहे. त्यासाठी त्यांना दोन वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांचा जमीन देखील मंजूर करण्यात आला आहे.