पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाजी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या भाजपाच्या ‘गांव चलो अभियानात’ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सहभागी झाले. नरेंद्र मोदीजी यांनी ‘गावाकडे चला’ची साद घातली आहे, हे पाहून विशेष आनंद वाटतो असल्याचे यावेळी पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हटले कि, मलाही गावी जायला नेहमीच आवडतं. माझे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असून या गावातील लोकसंख्या १,२०० इतकी आहे. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा गावी जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणे मला नेहमीच आवडते. त्यामुळे या अभियानात सहभागी होताना प्रचंड आनंद वाटला .या अभियानाच्या निमित्ताने पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील नाणेगावच्या ग्रामस्थांशी संवाद देखील साधला.
यावेळी पाटील यांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देशभरात राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. तसेच, सर्वांसोबत जेवणाचाही आस्वाद घेतला. गावच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यानिमित्ताने पाटील यांनी दिली. यावेळी पाटील गावच्या विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन झाले . हा अनुभव मनाला सुखावणारा वाटला असल्याचेही त्यांनी म्हटले.