सुप्रसिद्ध आध्यात्मिक मार्गदर्शक गौर गोपाल दास महाराज यांचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि पालकांसाठी निश्चितच प्रेरणादायी – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे येथील कल्याणीनगरमधील हेरिटेज इंटरनॅशनल एक्स्पिरिएन्शियल स्कूलच्या वतीने विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सुप्रसिद्ध आध्यात्मिक मार्गदर्शक गौर गोपाल दास महाराज यांनी ‘मानसिक ताणतणाव, यश आणि आनंदी जीवन’ या विषयावर उपस्थितांना अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आजच्या धावपळीच्या युगात मानसिक आरोग्य जपून यशाकडे कसे जावे, याचे अनमोल विचार स्वामीजींनी मांडले. त्यांचे हे मार्गदर्शन विद्यार्थी आणि पालकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटील यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला व त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे त्यांनी म्हटले.
गौर गोपाल दास यांनी आपल्या मार्गदर्शनात ताणतणाव व्यवस्थापन आणि खऱ्या यशाची व्याख्या स्पष्ट केली. त्यांचे हे विचार उपस्थित विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. यशाच्या शिखराकडे जाताना मनाची शांतता कशी टिकवावी, याचे अनेक पैलू त्यांनी यावेळी उलगडले. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात केवळ भौतिक यश मिळवणे पुरेसे नसून, मानसिक आरोग्य जपून आनंदी जीवन जगणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादनगौर गोपाल दास महाराज यांनी केले.