पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वांनी भरीव योगदान द्यावे, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोकसभेच्या माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्याला हजेरी लावली. यासोबतच सांगोल्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वांनी भरीव योगदान द्यावे असे आवाहनही याप्रसंगी केले.

यावेळी आ. शहाजीबापू पाटील यांच्या सह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!