पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांच्या विजयासाठी रविवारी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकी दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी आ.भीमराव तापकीर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, वर्षाताई तापकीर, सचिन मोरे यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते