पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात भव्य सभा… आजपर्यंत अशी सभा झाली नाही अशी भव्य सभा घेण्याचे नियोजन आम्ही करत आहोत – चंद्रकांत पाटील
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २९ एप्रिल रोजी होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ताधारी आघाडीची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार राहुल कुल , हर्षवर्धन पाटील , विजय शिवतारे, राजेश पांडे यांच्यासह चारही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.