पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात महायुतीची बैठक; विजयासाठी पूर्ण ताकदीने उतरण्याचे लोकप्रतिनिधींचे आवाहन

7

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत भाजपा-महायुतीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यात आला. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे, त्यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे मार्गदर्शन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.

या निवडणुकीत भाजपा-महायुतीचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार केला.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्यासह भाजपा-महायुतीचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.