पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘सकाळ’च्या ‘गौरवगाथा’ आणि ‘ॲडव्होकेट यशोगाथा’ कॉफी टेबल बुक्सचे दिमाखात प्रकाशन; खासदार उज्ज्वल निकम व नरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती

5

पुणे : पुणे येथे दैनिक ‘सकाळ’च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेल्या मराठा उद्योजकांच्या यशोगाथेवरील ‘गौरवगाथा’ आणि विधिज्ञांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणाऱ्या ‘ॲडव्होकेट यशोगाथा’ या दोन कॉफी टेबल बुक्सचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कोंढवा येथील जयराज स्पोर्टस अॅण्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा सोहळा पार पडला. या प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, संपादक संतोष शाळीग्राम, सिद्धार्थ माळवदकर यांच्यासह मान्यवर, उद्योजक आणि विधिज्ञ उपस्थित होते.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वकिली क्षेत्र हे न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. या क्षेत्रात आपल्या ज्ञानाने, अनुभवाने आणि प्रभावी मांडणीने न्यायव्यवस्थेत योगदान देणाऱ्या वकिलांचा गौरव करण्यासाठी ‘अॅडव्होकेट यशोगाथा’ सारखा उपक्रम आयोजित करणे निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी नव्या पिढीतील वकिलांसाठी मार्गदर्शक ठरू शकते.

त्याचप्रमाणे प्रोफेशनल काम करणे ही एक गोष्ट आहे आणि समाजाप्रती बांधिलकी जपत निःस्वार्थ भावनेने काम करणे ही त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. असे काम करत पुण्याच्या वैभवात भर घालण्याचे काम मराठा समाजातील अनेकांनी केले आहे. स्वतःच्या प्रगतीसोबत इतरांना घडविणे, त्यांना संधी देणे आणि समाजासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करणे, यातच खऱ्या कर्तृत्वाचे समाधान आहे. कर्तृत्व आणि नम्रता अशा दोन्हींचा मिलाप असलेल्या व्यक्तींचा गौरव आज झाला आहे. ‘सकाळ’ने अशा समाजातील रत्नांना सातत्याने लोकांसमोर आणावे आणि त्यांच्या कार्यातून पुढील पिढीला प्रेरणा द्यावी, हीच अपेक्षा असल्याचे देखील पाटील यावेळी म्हणाले.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील व्यक्तींच्या संघर्षाची, मेहनतीची, जिद्दीची आणि यशस्वी वाटचालीची माहिती या पुस्तकातून मांडण्यात आली आहे. या माध्यमातून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची नोंद तर घेतली जाणारच आहे. तसेच, त्यांच्या कार्याची ओळख व्यापक समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातून पुढे येऊन विविध क्षेत्रांत आपले स्थान निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.

यावेळी सूर्यकांत काकडे, अमित गायकवाड, अनिरुद्ध भोसले, अनिश मोरे, धनंजय निम्हण, गजानन पाटील, गोरक्षनाथ बालवडकर, जिगर गवळी, कल्याणराव जाधव, किरण पाटील, माधुरी निम्हण वाळुंज, गायत्री निम्हण-कदम, महेश शिंदे, नरेंद्र बालवडकर, निखिल भोसले, निर्मला येमूल, नितीन अष्टेकर, प्रकाश जगताप, प्रवीण बडेकर, रामदास मुरकुटे, रणजित मोरे, रणजित वाळुंजकर-पाटील, रवींद्र साळेगावकर, सागर भोसले, सौरभ कुंजीर, शशिकांत गायकवाड, सुभाष गायकवाड, सुदर्शन चौधरी, तानाजी पाटील, तेजस जाधव, विजय कटके, विलास यादव, योगेश पासलकर यांचा गौरव करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.