भारतीय इतिहासात आपल्या विचारांनी आणि कार्याने समाजाला नवी दिशा देणाऱ्या महापुरुषांमध्ये महात्मा जोतिराव फुले यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

11

पुणे : महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय पुस्तक न्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महात्मा जोतिराव फुले आणि आजची तरुणाई’ या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या महान विचारांना अभिवादन केले.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले, भारतीय इतिहासात आपल्या विचारांनी आणि कार्याने समाजाला नवी दिशा देणाऱ्या महापुरुषांमध्ये महात्मा जोतिराव फुले यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेले कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे.

पाटील पुढे म्हणाले, आजच्या तरुणांनी करिअरचा विचार करताना केवळ वैयक्तिक यशाला प्राधान्य न देता, समाजाच्या गरजा आणि समस्यांचे भान ठेवून सामाजिक परिवर्तनासाठीही योगदान दिले पाहिजे. महात्मा फुले यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेत तरुणाईने सामाजिक बांधिलकी जपत देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहदेखील त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे मिलिंद मराठे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, समर्थ युवा फाउंडेशनचे तसेच राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, बागेश्री मंठाळकर, प्रफुल्ल पवार, डॉ. गणेश भामरे, प्रा. डॉ. संजय चाकणे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.