नवभारत-नवराष्ट्र समूहाद्वारे आयोजित ‘नवभारत सोशल इम्पॅक्ट समिट २०२६’ हा सोहळा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न

7

पुणे, २२ मे २६ : पुणे येथे नवभारत-नवराष्ट्र समूहाद्वारे आयोजित ‘नवभारत सोशल इम्पॅक्ट समिट २०२६’ हा सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्र निर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करणे आणि त्यांच्या योगदानाचा सम्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या सोहळ्यात नवभारत समूहाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील आणि विचारांवरील विशेष ‘कॉपी टेबल बुक’चे प्रकाशन देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सामाजिक कार्य हे मानसिक आणि आध्यात्मिक समाधानातून निर्माण होते, ज्याची शिकवण आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानातील ‘अद्वैत’ सिद्धांतातून मिळते. म्हणूनच CSR चे स्वरूप बदलून, त्याचा वापर सर्वसामान्यांचे दुःख दूर करण्यासाठी आणि एक दुःखमुक्त समाज निर्माण करण्यासाठी केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर याच धर्तीवर, सीएसआरच्या माध्यमातून सध्या पुणे आणि कोथरूड परिसरात विविध लोककल्याणकारी प्रकल्प राबवले जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या महत्त्वपूर्ण सोहळ्याला नवभारत-नवराष्ट्र समूहाचे ए. श्रीनिवास, समूह संपादक संजय तिवारी, पुण्याचे निवासी संपादक अनिकेत जोशी, रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज के. ग्रांट, उद्योजक सुशील मोझर आणि कृष्णकुमार गोयल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.