आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे, जोमाने काम करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस येथे भारतीय जनता पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पलूस येथे 300 हून अधिक कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश समारंभ, कार्यकर्ता मेळावा देखील येथे पार पडला.
या प्रसंगी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी , आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे, जोमाने काम करावे असे आवाहन केले.
यावेळी आमदार सदाभाऊ खोत, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट (बाबा) महाडिक, पृथ्वीराज देशमुख, शरदभाऊ लाड, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पाटील, नंदकुमार (आप्पा) पाटील, अतुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.