आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक प्रगती या ध्येयाने MACCIA नक्कीच नव्या उंचीवर पोहोचेल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : सांगली येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या राज्यस्तरीय संस्थेचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर (MACCIA) नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र माणगांवे यांचा सन्मान करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक प्रगती या ध्येयाने MACCIA नक्कीच नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. तसेच संस्थेच्या नेतृत्वाखाली राज्यातील उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राला नवचैतन्य व बळकटी मिळेल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, भाजपा नेत्या निताताई केळकर, भाजपा नेते प्रकाश ढंग, दीपकबाबा शिंदे, पृथ्वीराज पवार, भालचंद्र पाटील, तसेच चेंबरचे रमेश आरवाडे, सर्जेराव नलावडे, चितळे डेरीचे गिरीश चितळे, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, थोटे डेअरीचे शितल थोटे आणि MACCIA चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.