शिक्षक आणि पदवीधरांच्या अपेक्षा, त्यांचे प्रश्न आणि विकासाच्या संधी यांचा विचार करून प्रभावी प्रचारयंत्रणा उभारण्यासह विजयासाठी सर्वांनी समन्वयाने व जोमाने काम करा – मंत्री चंद्रकांत पाटील

6

सांगली : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली व मिरज येथे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत निवडणुकीच्या प्रचाराचे पुढील नियोजन आणि रणनीती यावर सविस्तर चर्चा केली.

आगामी निवडणुकीत भाजपा-महायुतीची भूमिका आणि सरकारने शिक्षण व रोजगार क्षेत्रात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर यावेळी भर दिला. शिक्षक आणि पदवीधरांच्या अपेक्षा, त्यांचे प्रश्न आणि विकासाच्या संधी यांचा विचार करून प्रभावी प्रचारयंत्रणा उभारण्यासह विजयासाठी सर्वांनी समन्वयाने व जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी मंत्री पाटील यांनी केले.

या बैठकीला माजी मंत्री तथा आमदार सुरेश खाडे, आमदार धनंजय उर्फ सुधीर गाडगीळ, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश सचिव शरद लाड, विक्रम पावसकर, मकरंद देशपांडे, भाजपाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.