महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी सरकार खंबीर, मतदारांच्या आशा-अपेक्षा निश्चित पूर्ण करू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापुरात ग्वाही

9

कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे पदवीधर आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांना कोल्हापूरकरांनी सर्वाधिक मतांनी निवडून द्यावे, महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे राहून मतदारांच्या आशा, अपेक्षा निश्चतपणे पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. कोल्हापूर ही क्रांतीची तसेच विक्रम प्रस्तापित करणारी भूमी आहे, महायुतीने पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी कोल्हापूरचेच उमेदवार दिले असून या दोन्ही उमेदवारांनी निवडूण देऊन आपले हक्काचे आमदार बनवा असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्य शासनाने महाराष्टाच्या सर्वागिण विकासासाठी अनेकविध क्रांतीकारी निर्णय घेतल आहेत, सामान्य माणूस तसेच शेतकरी डोळयसमोर ठेऊन काम गतीने सुरु आहे.

भाजपा-महायुतीने पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघासाठी श्री. कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. करवीर निवासिनी आई अंबाबाईचा आशीर्वाद या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी असून, पदवीधर आणि शिक्षक मतदारांनीही आपल्या मतांच्या रूपाने आशीर्वाद देत दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

या प्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री विनय कोरे, भाजपा-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्यासह अन्य मान्यवर, पदवीधर आणि शिक्षक बांधव उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.