कोल्हापुरात तीन दिवसीय ‘आयएफएफई एक्स्पो २०२६’चे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; स्थानिक उद्योजकांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा

6

कोल्हापूर : अन्न प्रक्रिया आणि पॅकेजिंग उद्योगातील नवे तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामग्री आणि व्यवसाय वाढीच्या संधींची माहिती स्थानिक उद्योजकांना व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘आयएफएफई एक्स्पो २०२६’ (IFFE Expo 2026) या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटील यांनी प्रदर्शनास आणि सर्व उद्योजकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, सध्याच्या स्पर्धेच्या युगात बाजारात रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. या एक्स्पोमुळे अन्न प्रक्रिया आणि पॅकेजिंग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि व्यवसाय विस्ताराच्या नव्या संधी उद्योजकांना एकाच ठिकाणी पाहता व समजून घेता येत आहेत. स्थानिक उद्योजकांना जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी बळ देणारा हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी एक्झिफेरन्स मीडिया आणि नेक्स्पोस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उद्योजक आणि नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.