सोलापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्राची संघटनात्मक बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

12

सोलापूर : सोलापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्राची संघटनात्मक बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांनी आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद व नगरपालिका सदस्य आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, संघटन हीच आपली ताकद आहे. त्यामुळे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेत आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, SIR पडताळणी तसेच पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणी अभियानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात भाजपा परिवाराची विचारधारा आणि जनसेवेचे कार्य तळागाळापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने समर्पित भावनेने कार्य करावे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. पक्षाचा तळागाळातील विस्तार अधिक मजबूत करण्यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मतदार नोंदणीची स्वतंत्र जबाबदारी देण्यावर विशेष भर देण्यात आला. आगामी राजकीय आव्हाने व बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्षम, सक्रिय आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वपूर्ण रणनीती निश्चित करण्यात आली.

या बैठकीस मंत्री जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, SIR महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी, SIR प्रदेश संयोजक डॉ. किरीट सोमय्या, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मनोज घोरपडे, आमदार राहुल कुल, प्रदेश सचिव राम सातपुते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.