शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूरच्या पहिल्याच बॅचमधील मानव गायकवाडची ‘Atlas Copco’ मध्ये निवड; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

6

कोल्हापूर : कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (GCOE, Kolhapur) पहिल्याच बॅचमधील मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंगचा प्रतिभावान विद्यार्थी मानव राहुल गायकवाड याची नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी ‘Atlas Copco’ मध्ये वार्षिक ₹६ लाख CTC पॅकेजवर निवड झाली असून, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे. महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड होणारा मानव हा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.

इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यशमानवने आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीने, जिद्दीने आणि अद्ययावत तांत्रिक कौशल्याच्या जोरावर हे घवघवीत यश संपादन केले आहे. पहिल्याच बॅचमधील विद्यार्थ्याने कॉलेजला मिळवून दिलेले हे यश इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहे. मंत्री पाटील यांनी मानवचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

रोजगाराच्या संधींसाठी शासन कटिबद्धया यशाचा गौरव करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे एवढाच आमचा हेतू नाही, तर उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजांनुसार त्यांना आवश्यक ती कौशल्ये आणि रोजगाराच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने आपल्या कर्तृत्वाची नवी उंची गाठावी, हाच आमचा संकल्प असल्याचे त्यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.