भाजपचे नेते आणि प्रसिद्ध सिनेअभिनेते रमेश परदेशी यांच्या वडिलांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन वाहिली श्रद्धांजली

6

पुणे : भाजपचे नेते आणि प्रसिद्ध सिनेअभिनेते रमेश परदेशी यांच्या वडिलांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २३ ऑक्टोबर रोजी रमेश परदेशी यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी दिवंगत वडिलांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या अत्यंत कठीण प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रमेश परदेशी आणि त्यांच्या संपूर्ण परदेशी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याचे जाणे हे अत्यंत क्लेशदायक असून, या दुःखद प्रसंगी आपण व आपले सर्व सहकारी परदेशी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

“परदेशी कुटुंबीयांवर ओढवलेल्या या मोठ्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर दिवंगत बाबांच्या पवित्र आत्म्यास सद्गती प्रदान करो आणि परदेशी कुटुंबीयांना या आघातातून व दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना,” अशा शब्दांत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.