सांगली जिल्हा बँक आणि पुणे पदवीधर-शिक्षक निवडणूक; सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वाची बैठक
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक, तसेच पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली येथे भाजपची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही महत्त्वपूर्ण निवडणुकांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे आणि निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आखायची रणनीती या संदर्भात त्यांनी उपस्थित नेत्यांना व कार्यकर्त्यांना आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस माजी मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुरेशदादा गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मकरंद देशपांडे, नीताताई केळकर, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.