फॅशनच्या माध्यमातून अनुभवला शिवरायांचा पराक्रमी इतिहास; ‘मिस हेरिटेज इंडिया २०२६’ सोहळ्याला मंत्री चंद्रकांत पाटलांची उपस्थिती
पुणे : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश होणे, ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. याच ऐतिहासिक वैभवाचा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा परिचय नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने मृणाल गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘मिस हेरिटेज इंडिया २०२६’ या अनोख्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
यावेळी संबोधित करताना मंत्री पाटील म्हणाले, फॅशनच्या माध्यमातून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांचा वारसा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन करत तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सुंदर प्रयत्न आहे. या अनोख्या सोहळ्याचा साक्षीदार होता आले, याचा मनस्वी आनंद आहे.
या कार्यक्रमास ओमप्रकाश शेटे, भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, प्रकाशतात्या बालवडकर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे, प्रमोद निम्हण, मोरेश्वर बालवडकर, अनिकेत चांदेरे, सुमित गायकवाड, आस्मिता करंदीकर, वैदेही बापट, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, स्मृती जैन, वंदना सिंह, निकिता माथाडे, जागृती विचारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.