मुख्यमंत्री हे आजच्या काळातील दुसरे शाहु महाराज – विनायक मेटे
मुंबई : मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाची मान्यता मिळताच, मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महसुल मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांचे निवासस्थानी जाऊन शिवसंग्राम तथा भारतीय संग्राम परिषदेच्या वतीने शाल, हार व पेढे भरवून सत्कार केला आणि आभार मानले, यावेळी छोटेखानी कार्यक्रमात बोलताना आ.मेटे म्हणाले कि “मराठा समाजाला आरक्षण देने आणि ते न्यायालयात टिकणे ही ऐतिहासिक गोष्ट आहे.छत्रपती शाहूमहाराजांनी त्या काळात गरिबांना आरक्षण दिले होते आणि आजच्या काळात मराठा समाजातील अर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देऊन मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शाहू महाराजा सारखे काम केले आहे त्यामुळे मा.मुख्यमंत्री हे आजच्या काळातील दुसरे शाहु महाराज ठरले आहेत” असे गौरवोदगार आ. मेटे यांनी काढले, यावेळी सोबत आ. डॉ. भारती ताई लव्हेकर, दिलीपराव माने, विक्रांत आंब्रे, राम जगदाळे, हरिश्चन्द्र राणे, अविनाश खापे, सतीश परब, योगीराज दाभाड़कर, राहुल मस्के, हिंदूराव जाधव इ. जण उपस्थित होते.