आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडून पूरग्रस्त महाड शहराची पाहणी
महाड : महाड शहरातील पूर ओसरल्यानंतर आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड बाजारपेठीतील नुकसानीची पाहणी करत, पूरग्रस्त नागरिक व्यापाऱ्यांची विचारपूस केली. प्रांताधिकारी विठ्ठल नामदार, तहसिलदार चंद्रसेन पवार, महाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या बरोबर चर्चा करत पूर परिस्थितीमधील बचाव कार्याची व नुकसानीची माहिती घेतली . ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणाचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या .
पाहणी दरम्यान आमदार भरतशेठ गोगावले यांच्या समवेत दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकासशेठ गोगावले, महाड विधानसभा संपर्क प्रमुख विजय सावंत, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, महाड शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन पावले,महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक सावंत, नगरसेवक बंटी पोटफोडे, सुनील अग्रवाल, महाड शहर शिवसेनेचे सिद्धेश पाटेकर, विकी शिंदे, निखिल शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते .