राष्ट्रवादीत प्रवेश करताच अभिनेत्री सुरेखा कुडची यांना मोठी जवाबदारी

राष्ट्रवादीचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची, अभिनेते संभाजी तांगडे, गीतकार-लेखक बाबासाहेब सौदागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागामध्ये अभिनेत्री सुरेखा कुडची यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी, अभिनेते संभाजी तांगडे यांची मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी आणि गीतकार लेखक बाबासाहेब सौदागर यांची खान्देश विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग सेलचे राज्यप्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने रंगकर्मी, नाट्य चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ यांच्या समस्यांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष अभिनेत्री प्रिया बेर्डे, प्रदेश उपाध्यक्ष अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेत्री मेघा घाडगे, पुणे शहर अध्यक्ष अभिनेते गिरीश परदेशी, अभिनेता प्रियदर्शन जाधव, विदर्भ अध्यक्ष गायिका वैशाली माडे, अभिनेते डॉक्टर सुधीर निकम, निर्माते मंगेश मोरे, निर्माते संतोष साखरे आणि लेखक दिग्दर्शक कौस्तुभ सावरकर उपस्थित होते.