‘आठशे खिडक्या, नऊशे दार’ टेलिव्हिजनच्या इतिहासातील अभिनव प्रयोग

14

IME या प्रोडक्शनच्या व सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून एक आगळा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे आणि तो आपल्या सर्वांच्या समोर लवकरच येणार आहे..तुम्ही म्हणाल कोणता प्रयोग ? त्याच नाव आहे ‘आठशे खिडक्या, नऊशे दार’ हि सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणारी मालिका. विशेष म्हणजे सर्व कलाकारांनी स्वतःच्या घरी थांबून शूट करत हि मालिका शूट केली आहे. अभिनेत्री, लेखिका विभावरी देशपांडे हिने या मालिकेसाठी लेखन केले आहे. या मालिकेचे श्रीरंग गोडबोले दिग्दर्शक, आनंद इंगळे, लीना- मंगेश कदम, सखी-सुव्रत, समीर चौघुले, विशाखा सुभेदार यांसारखे अनेक दिग्गज मराठी कलाकार या मालिकेत आपल्याला दिसणार आहेत.

टेलिव्हिजनच्या इतिहासातील या अभिनव प्रयोगाचे सर्वांकडून स्वागत करण्यात येत असून या मालिकेचा प्रोमो देखील उत्सुकता वाढवणारा आहे.