राज्यसभेसाठी भाजपच्या निलंबित १२ आमदारांच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस म्हणतात…

13

नागपूर: राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी आज रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, भाजपने या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी सवांद साधला.

दवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी माझी भेट घेतली. त्यांनी मला राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती केली आहे. याबाबत कोअर कमेटी, प्रदेशाध्यक्ष या सगळ्यांशी चर्चा करु नंतर निर्णय घेऊ, असे मी त्यांना सांगितले आहे. यामध्ये १२ आमदारांचा विषय झाला नाही. भाजपा सौदेबाजी करत नाही. काही जणांना अलीकडच्या काळामध्ये पतंग उडवायची सवय झाली आहे. त्यामुळे (१२ आमदारांचा विषय) त्यांनी उडवलेल्या पतंगी आहेत. आमचे १२ आमदार ज्यांना निलंबित केले आहे, ते नियमबाह्य आहे. त्या संदर्भात आम्ही न्यायालयात लढा देत आहोत.

राष्ट्रवादी-शिवसेना नाराज?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करायची असेल तर त्या बदल्यात भाजपचे निलंबित 12 आमदारांवरील कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. या साठमारीच्या राजकारणामुळे आणि काँग्रेस नेत्यांच्या आजच्या लोटांगण प्रयत्नामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

Get real time updates directly on you device, subscribe now.