आर्यन खानला न्यायालयीन कोठडी, जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश

14

मुंबई: क्रूझ ड्रग्स केस प्रकरणात अडकलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज (7 ऑक्टोबर) पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ड्रग्स प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होत आहे. सुनावणीदरम्यान, आरोपींची कोठडी एनसीबीने 11 ऑक्टोबरपर्यंत मागितली होती. आज कोर्टाने आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि तसंच जामिनासाठी अर्ज करण्यासही सांगितलं आहे.

NCB ने सांगितले की क्रूज ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एनसीबीने म्हटले की, आर्यनने नाव घेतल्यानंतर या प्रकरणात अचित कुमार याची अटक झाली आहे. अरबाज मर्जेंटनेही त्याचे नाव घेतले होते. याबाबतची चौकशी करण्यासाठी एजन्सीला आरोपीची कस्टडी वाढवून हवी असल्याचं सांगितलं.

एनसीबीने आर्यनवर केले आहेत गंभीर आरोप

ड्रग्ज प्रकरणी 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. एनसीबीच्या वतीने, न्यायालयात सांगण्यात आलं होतं की, आर्यन खानच्या मोबाइलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि चॅट्सच्या लिंक सापडल्या आहेत. ज्यासाठी एनसीबीने पुढील चौकशीसाठी 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती. तथापि, न्यायालयाने आर्यन खान आणि इतर दोघांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत राहण्याचे आदेश दिले होते.

आर्यन खानच्या बाजूने प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला होता. आर्यन खान याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नव्हते. तसेच त्याकडे बोर्डिंग पास नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे तो पार्टीसाठी गेला होता. त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्याच्या बॅगेतही काहीच मिळालं नाही. त्याचा मित्र अरबाज याच्याकडे 6 ग्रॅम चरस सापडलं. दिल्लीची मॉडेल मुनमुन धरेजा हिच्याकडे 5 ग्रॅम चरस सापडलं होतं. या दोन आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा आर्यनचा संबंध नाही, असं आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितलं होतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.