नारायण राणे यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही – विनायक राऊत

मुंबई: शिवसेना आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद हा सर्वपरिचित आहे. राणेंकडून नेहमी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. आज शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला. “आम्ही राणेंच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहे. वेळ आल्यास राणेंची कुंडलीच बाहेर काढू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

हे पण वाचा: ‘माझी प्रार्थना आहे की, आर्यन खानला जामीन मिळावा’ – राम कदम

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नारायण राणे यांनी प्रहारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार असल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या उद्याच्या लेखामध्ये काय छापून येणार ते बघू. पण ते स्वतः चिखलात बुडालेले आहेत. राणेंनी आमच्याबद्दल काही लिहिल्यास आम्हीही गप्प बसणार नाही. आम्हीसुद्धा राणेंचा रक्तरंजित इतिहास बाहेर काढू. आम्ही राणे यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहेत, असे राऊत यावेळी म्हणाले.

हे पण वाचा: अजितदादांना म्हटलं मला परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो – शशिकांत…

यावेळी त्यांनी तपास यंत्रणांनाही कानपिचक्या दिल्या. तपास यंत्रणांनी आपलं काम करावं. पण काम करत असताना दबावाखाली करू नये. तपास करताना प्रसिद्धीचा स्टंट केला जातो. तपास यंत्रणांनी घाबरवण्याचे काम करू नये हे नरेंद्र मोदींच मत योग्यच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Read Also :