आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: मोठे घोटाळे झाकण्यासाठी आर्यनला अटक; छगन भुजबळांची भाजपवर टीका
बीड: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला 2 ऑक्टोबरला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. आत्तापर्यंत चारवेळा त्याला जामीन मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला मात्र तो फेटाळण्यात आला आहे. अशात आर्यन खानच्या अडचणी एकीकडे वाढत असताना दुसरीकडे राज्यातले नेते या प्रकरणी भाजपवर टीकेचे ताशेरे झोडत आहेत.
दसऱ्याच्या आधी शरद पवारांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनीही NCB आणि इतर तपास यंत्रणा केंद्राच्या सांगण्यावरून कारवाई करत असल्याचं म्हटलं होतं. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीही अशाच प्रकारची टीका केली. आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकरणावरून भाजपला लक्ष्य केलं आहे.
मोठे घोटाळे झाकण्यासाठीच शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. जर शाहरुख खानने जर भाजपमध्ये प्रवेश केला तर त्या ड्रग्जची पिठी साखर होईल अशी खोचक टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले की, बॉलिवूडला बदनाम करण्याचे काम सध्या सुरू आहे. 30 कोटींचे कोकेन कुणाचं आहे याकडे लक्ष जाऊन नये. त्याचबरोबर मोठ्यांचे पकडलेले घोटाळे दाबण्यासाठी स्टार असणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला पकडण्यात आले आहे. जर शाहरुख खान ने भारतीय जनता पार्टी प्रवेश केला तरच त्या ड्रग्सचं देखील पिठी साखर होईल असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
Read Also :
-
बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी औरंगाबादचं नाव बदललं –…
-
तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादच नाव संभाजीनगर करून दाखवाच – खासदार इम्तियाज जलील
-
मोठी बातमी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण
-
आर्यन खानच्या अडचणीत वाढ; एनसीबीकडून बँकेचे व्यवहार शोधायला सुरुवात
-
मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर त्याविरोधात भाजप आंदोलन करेल; आशिष शेलार…