राहुल देशपांडे – आर्या आंबेकरच्या आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध, लहू बालवडकर सोशल वेल्फेअर फाऊंडेशनच्या सूर संध्येला बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगेकरांचा उदंड प्रतिसाद

पुणे – लहु बालवडकर सोशल वेलफेअर च्या वतीने नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या सूर संध्या या सांगितीक मेजवानीला बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे करांचा उदंड प्रतिसाद

दिवाळी सणाच्या निमित्ताने लहु बालवडकर सोशल वेलफेअर च्या वतीने बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे येथील नागरिकांसाठी सूर संध्या या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन बाणेर येथील बंटारा भवन येथे करण्यात आले होते.

या सांगितीक कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर सभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी केले.

 

लहु बालवडकर सोशल वेलफेअर चे संस्थापक लहु गजानन बालवडकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पुणे महानगर चे कार्यवाह महेश करपे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते.

या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या स्वयंसेवकांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय आणि सामाजिक सेवेबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने हृदय सत्कार या वेळी करण्यात आला.

“कोरोना काळात संपूर्ण जग झुंजत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे शेकडो कार्यकर्ते, स्वयंसेवक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त या राष्ट्राच्या मदतीसाठी आपले मदतकार्य अविरत चालू ठेवले. या निमित्ताने लहु गजानन बालवाडकर यांनी पुढाकार घेऊन केलेला हा हृदय सत्कार खरंच सर्व स्वयंसेवकांचे मनोधैर्य उंचावणारा आहे”
अश्या भावना या वेळी महेश जी करपे आणि मुरलीधरजी मोहोळ यांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाला, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, स्वप्नालीताई सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रभाग क्र. 9 च्या भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा उमाताई गाडगीळ, अस्मिताताई करंदीकर, उज्वलाताई साबळे, स्वरूपाताई शिर्के, विद्या बालवडकर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थिती होते.