नमो चषक २०२४’ च्या विजेत्यांना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या शुभेच्छा…  भविष्यात सर्वोतोपरी मदत करण्याची दिली ग्वाही

5

पुणे : राज्यातील खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव मिळावा या संकल्पनेतून भाजपाच्या वतीने राज्यात ‘नमो चषक २०२४’ चे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातही खेळांचा महाकुंभच संपन्न झाला. विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये कोथरुडकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, असल्याची माहिती पाटील यांनी दिली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला.

चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरव केला. तसेच, खेळाडुंना शुभेच्छा देताना; त्यांना भविष्यात सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील पाटील यांनी दिली. यावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कोथरुडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.