पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वात देश प्रगतीची परीसीमा गाठत आहे – चंद्रकांत पाटील

23
पुणे, ०३ मे : पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुणे महापालिका आणि पुणे व खडकी कँन्टोन्मेंट येथील सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षाचे १०० हून अधिक नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वात देश प्रगतीची परीसीमा गाठत आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात देशात अनेक नवे प्रकल्प उदयास येऊन मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून असलेला देश आता स्वदेशी तंत्रज्ञानावर चालत आहे. त्यामुळे ‘भाजपा म्हणजे विकास’ ही संकल्पनाच देशात रूढ झाली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त विकसित भारत घडावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे स्वप्न आहे. त्यामुळे मोदीजींचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना मतदानाबाबत जागृत करावे असे आवाहन याप्रसंगी पाटील यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांनीं मार्गदर्शन करता म्हटले कि, प्रभागात घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी-गाठी घेतल्या पाहिजेत. लोकांना आपण करीत असलेले काम, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी देशासाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या योजना याबद्दल माहिती दिली पाहिजे, असे सांगितले.
महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ, शहरातील पक्षाचे सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.