धक्कादायक: पुण्यात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

पुणे: पुणे जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून महिलांवर अत्याचाराची घटना वाढत आहे. परत एकदा पुणे जिल्ह्यातील एका २९ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. गुरे बांधायला गोठ्यात गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील भांबवडे गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. 29 वर्षीय पीडित शेतकरी महिलेने राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून राजगड पोलिसांनी तिघा आरोपींच्या विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

शेतकरी महिला आपल्या गोठ्यात गुरं- ढोरं बांधत होती. त्यावेळी आरोपी अनिल आणि महेश तिथे अचानक गेले. त्या नंतर गोठ्याच्या दाराची कडी त्यांनी लावून घेतली. महिला एकटी असल्याची संधी साधत आरोपी अनिल आणि महेश यांनी पीडित शेतकरी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. 10 ऑक्टोबर 2021 ते 5 नोव्हेंबर 2021 या काळात ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून राजगड पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी तिघा आरोपींना तातडीने अटक केली आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!